विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 00:00 IST2025-07-25T23:59:42+5:302025-07-26T00:00:04+5:30

Rajasthan School Building Collapse: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Rajasthan School Building Collapse: Students said, Guruji, the roof was collapsing, but the teachers kept it in place, shocking information comes to light in the school accident | विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या झालेल्या या शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळंत असल्याची जाणीव वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना झाली होती. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दरडावून वर्गातच बसवून ठेवल्याने काही वेळातच पुढील दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आता पाच शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना एका विद्यार्थिनीने सांगितले की, शाळेच्या इमारतीच्या छप्परावरून दगड खाली पडत होते. जेव्हा मुलांनी याबाबतची माहिती शिक्षकांना दिली. तेव्हा शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दरडावले आणि वर्गात बसवून ठेवले. त्यानंतर काही वेळातच छप्पर कोसळले आणि विद्यार्थी त्याखाली सापडले.  ही दुर्घटना घडली तेव्हा शिक्षक जवळच नाश्ता करत होते.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत पाच शिक्षक आणि पाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्याशिवाय या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एक तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पाकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही सरकारकडे विनवण्या करत होतो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता सरकार आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? असा हृदयद्रावक सवाल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे पालक विचारत आहेत.  

Web Title: Rajasthan School Building Collapse: Students said, Guruji, the roof was collapsing, but the teachers kept it in place, shocking information comes to light in the school accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.