शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

Rajasthan Political Crisis: ...तर आम्ही पुन्हा पक्षात येऊ; सचिन पायलट यांच्या समर्थकांनी केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 13:34 IST

काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सचिन पायलट सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिल्याचे दिसून आले.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. त्यामुळे यावर काही मार्ग काढण्यासाठी आज सकाळी बैठक बोलवण्यात आली होती. सचिन पायटल आणि त्यांच्या समर्थकांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सचिन पायलट सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी आता सचिन पायलट यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Rajasthan Political Crisis)

सचिन पायलट यांच्या गटाकडून अशोक गहलोत यांचे नेतृत्व बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. अशोक गहलोत यांचे नेतृत्व बदलल्याशिवाय आम्ही परत काँग्रेस पक्षात येणार नाही, अशी ठाम भूमिका सचिन पायलट समर्थक आमदार भंवरलाल शर्मा यांनी स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे  २२ आमदारांचे संख्याबळ असून अशोक गहलोत यांच्याकडे बहुमत नसल्याचा दावा देखील भंवरलाल शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष देखील आता सक्रिय झाला आहे. या संदर्भात मंथन करण्याची घोषणा भाजपने राजस्थानात केली आहे.भाजपाच्या या बैठकीत सतीश पूनिया, गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, चंद्रशेखरसह अन्य प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीसोबतच भाजपा पहिल्यांदाच राजस्थानच्या राजकीय संघर्षात उतरल्याचं दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील राज्य नेतृत्व केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात राहून प्रत्येक हालचालींबाबत त्यांना माहिती देत आहेत. (Rajasthan Political Crisis)

भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासून सांगतोय हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आहे. आम्हाला जेव्हा वाटेल आमच्या भूमिकेची गरज आहे, त्यावेळी आम्ही एकत्र बसून चर्चा करु, सध्या राज्यात जे सुरु आहे त्याबाबत भाजपा (BJP) नेत्यांमध्ये बैठक होईल, त्यामध्ये पुढील विचार आणि भूमिका ठरवली जाईल. तसेच जर काँग्रेसला वाटत असेल भाजपा त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांनी याची चौकशी करावी, कोणतंही तथ्य नसताना उगाच राजकीय फायद्यासाठी विधानं करु नये असं त्यांनी काँग्रेसला (Congress) बजावलं आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी