Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:07 IST2020-07-13T14:06:53+5:302020-07-13T14:07:45+5:30
Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे सायलेंट माडवर

Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत
जयपूर: राजस्थानात सुरू असलेला राजकीय सत्तासंघर्ष थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील संघर्ष टोकाला गेला आहे. सरकार स्थिर असल्याचा दावा गेहलोत यांच्याकडून केला जात आहे. तर गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा पायलट यांचा दावा आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना गेहलोत मात्र अतिशय शांत असल्याचं दिसत आहे. गेहलोत यांना सरकार टिकण्याचा विश्वास आहे. यामागे भाजपाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे असल्याचं म्हटलं जात आहे.
सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानं राजस्थानातील सत्ता संघर्ष सुरूच आहे. राजस्थानातील भाजपाचे नेतेदेखील सक्रीय झाले आहेत. आमदारांच्या घोडेबाजारावरून दाखल करण्यात आलेला एफआयआर, मुख्यमंत्री गेहलोत यांचे भाजपावरील आरोप यावर वसुंधरा राजे शांत आहेत. त्यांनी शनिवारी आणि रविवारी अवघी दोन ट्विट केली आहेत. मात्र ती राजकारणाशी संबंधित नाहीत.
राजस्थानातल्या सत्तासंघर्षावर भाजपाच्या इतर नेत्यांप्रमाणे वसुंधरा राजे कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. यामागे राजकीय गणित असल्याचं राजकीय पंडित सांगतात. गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यामध्ये अतिशय उत्तम राजकीय केमिस्ट्री आहे. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राजे यांनी त्याविरोधात कोणतीही टीका केलेली नाही. इतकंच नव्हे, तर गेल्या दीड वर्षांत त्या सरकारविरोधात त्या सरकारविरोधात कधीही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत.
गेहलोत सत्तेत आल्यानंतर त्यांनी वसुंधरा यांच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांना पदावरून दूर केलं नाही. याची तक्रार पायलट यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून केली. त्यानंतर गेहलोत यांनी गुप्ता यांना पदावरून हटवलं आणि त्यांची नियुक्ती राजकीय सल्लागारपदी नियुक्ती केली. गुप्ता हे वसुंधरा यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेहलोत अतिशय कसलेले नेते मानले जातात. राजकीय गणित जुळवणं हे त्यांचं कौशल्य मानलं जातं.