अलवर - राजस्थानमध्ये झालेल्या वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनीही अलवरमधील रैणी भागात असेच एक वक्तव्य केले असून, त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे ममता भूपेश यांनी म्हटले आहे. सोमवारी रैणी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ममता भूपेश म्हणाल्या की, ''आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी आहे. त्यानंतर समाजासाठी, त्यानंतर सर्व समाजासाठी. सर्वांसाठी. सर्वांसाठी काम करता यावे हीच आमची इच्छा आहे."
आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:05 IST
राजस्थानमध्ये झालेल्या वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.
आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे
ठळक मुद्देराजस्थानमध्ये झालेल्या वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहेआमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनी केले