शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्यूसंख्या ७३

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्युसंख्या ७३

राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्युसंख्या ७३
जयपूर : राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या आणखी पाच रुग्णांचा शुक्रवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबरोबरच राज्यात जानेवारी २०१५ पासून स्वाईन फ्ल्यूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ७३ वर पोहोचली.
अजमेर, बाडमेर, जोधपूर, बनसवाडा आणि चित्तोडगढ जिल्ह्यात प्रत्येकी एका स्वाईन फ्ल्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे संचालक बी. आर. मीणा यांनी दिली. राज्यात १ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत एकूण ४९७ जणांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीत चाचणीत आढळून आले होते. त्यांपैकी ७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, असे मीणा यांनी सांगितले.
लखनौमध्ये आढळले स्वाईन फ्ल्यूचे ३१ रुग्ण
लखनौ : लखनौ येथे शुक्रवारी एका ५ वर्षांच्या मुलाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आल्याने शहरात या जीवघेण्या रोगाची लागण झालेल्यांची संख्या वाढून ३१ वर पोहोचली आहे.
सुयश शरण असे या मुलाचे नाव आहे. त्याला एच१एन१ विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत आढळले. स्वाईन फ्ल्यू झालेल्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ९ जानेवारीला शहरात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता. तर एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची पत्नी १३ जानेवारीला स्वाईन फ्ल्यूने दगावली होती. (वृत्तसंस्था)