"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:38 IST2025-06-07T15:37:43+5:302025-06-07T15:38:24+5:30
राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर बारानच्या दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद सभागृहात जनसुनावणी घेतली.

फोटो - आजतक
राजस्थानचेशिक्षण मंत्री मदन दिलावर बारानच्या दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद सभागृहात जनसुनावणी घेतली. त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्या सोडवल्या. यावेळी एक मनोरंजक घटना पाहायला मिळाली.
जनसुनावणीत उपस्थित असलेल्या दामिनी हाडा या विद्यार्थिनीने शिक्षणमंत्र्यांसमोर इंग्रजीत बोलायला सुरुवात केली तेव्हा मंत्र्यांना आधी आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर त्यांनी हसत हसत कान पकडले. "मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही" असं म्हटलं आहे.
मंत्र्यांनी असं म्हटल्यानंतर हिंदीमध्ये संभाषण सुरू झालं. विद्यार्थिनी दामिनी हिने जिल्ह्यातील सरकारी शाळांची दुर्दशा, जीर्ण इमारती, शिक्षकांची कमतरता आणि साधनसंपत्तीचा अभाव याबद्दल मंत्र्यांना माहिती दिली. सरकारी शाळांमधील शिक्षणाची स्थिती किती चिंताजनक आहे याबाबत तिने सांगितलं.