नवरदेवाला घालण्यासाठी 14.50 लाखांच्या नोटांचा हार आणला, दरोडेखोरांनी बंदूक दाखवून लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 20:10 IST2025-06-04T20:09:18+5:302025-06-04T20:10:00+5:30

एसपी, डीएसपींनी घटनास्थळी पोहचून चौकशी सुरू केली.

Rajasthan crime, A necklace worth Rs 14.50 lakh was brought to the groom to wear, but robbers robbed at gunpoint | नवरदेवाला घालण्यासाठी 14.50 लाखांच्या नोटांचा हार आणला, दरोडेखोरांनी बंदूक दाखवून लुटला

नवरदेवाला घालण्यासाठी 14.50 लाखांच्या नोटांचा हार आणला, दरोडेखोरांनी बंदूक दाखवून लुटला

अलवर: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर लग्न समारंभात दरोडा टाकला अन् नवरदेवासाठी आणलेला नोटांचा हार घेऊन पसार झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपी दरोडेखोरांना लवकरच पकडले जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे

काय आहे प्रकरण ?
तावडू येथील रहिवासी साद खान लग्न समारंभात नवरदेवाच्या गळ्यात नोटांचा हार घालण्याचे काम करतो. त्या बदल्यात तो 8 ते 10 हजार रुपये भाडे घेतो. 1 जून रोजी साद खानने चुहारपूर गावात एका लग्न समारंभात वराला घालण्यासाठी 14.50 लाख रुपयांच्या नोटांचा हार आणला होता. तो नवरदेवाला हार घालण्याचा विधी पूर्ण करुन घरी परतत होता. यादरम्यान, क्रेटा कारमधून आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि बंदुकीच्या जोरावर नोटांच्या हारांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला.

ही घटना खैरथल तिजारा जिल्ह्यातील भिवाडी चोपंकी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चुहारपूर गावात घडली. या दरोड्यात हार पुरवठादार साद खानच्या डोक्यालाही दुखापत झाली. या घटनेनंतर पोलिस-प्रशासन सतर्क झाले असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आज भिवाडीचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल साहू, डीएसपी कैलाश चौधरी, तिजारा डीएसपी शिवराज सिंह यांनी मोठ्या पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचून कसून चौकशी केली.

Web Title: Rajasthan crime, A necklace worth Rs 14.50 lakh was brought to the groom to wear, but robbers robbed at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.