भीषण अन् वेदनादायी; बलात्काराने भेदरलेली 'ती' अर्धा किलोमीटर अंतर विवस्त्र धावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 15:04 IST2019-09-14T14:47:32+5:302019-09-14T15:04:25+5:30
सामूहिक बलात्कारानंतर बलात्काऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अल्पवयीन तरुणी रस्त्यावर अर्धा किलोमीटर विवस्त्र धावल्याची घटना समोर आली आहे.

भीषण अन् वेदनादायी; बलात्काराने भेदरलेली 'ती' अर्धा किलोमीटर अंतर विवस्त्र धावली!
भिलवाडा - राजस्थानच्या भिलवाडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कारानंतर बलात्काऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अल्पवयीन तरुणी रस्त्यावर अर्धा किलोमीटर विवस्त्र धावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलवाडा येथे पीडित तरुणी दोघांसोबत बाईकवरून मंदिरात जात असताना हा प्रकार घडला आहे. मंदिरात जात असताना रस्त्याच्या बाजूला दारू पित असलेल्या काही जणांनी त्यांची बाईक अडवली. त्यानंतर तरुणीला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तरुणीसोबत असलेल्या तरुणांनी बाजारात जाऊन मदत मागितली.
एक दुकानदार त्यांच्या मदतीला आला. त्याला पाहताच बलात्कार करणारे पळून गेले. त्यावेळी संबंधित तरुणी विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर पळत होती तसेच ती अत्यंत घाबरलेली होती अशी माहिती दुकानदाराने पोलिसांना दिली आहे. तरुणीला थांबविल्यानंतर दुकानदाराने तिला कपडे दिले आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.