Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:43 IST2025-06-08T15:42:45+5:302025-06-08T15:43:07+5:30
एक संशयास्पद लाल कार, मास्क घातलेले लोक आणि एक बेपत्ता जोडपे... सीसीटीव्ही फुटेजने राजा आणि सोनमच्या बाबतीत नवीन रहस्ये उलगडली आहेत.

Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
इंदूरचा रहिवासी राजा रघुवंशी आपली पत्नी सोनम रघुवंशीसोबत मेघालयमधील शिलाँगमध्ये हनीमूनसाठी मेघालयात गेला होता. मात्र, त्याचा मृतदेह २५ किलोमीटर दूर सापडला आणि पत्नी अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणात समोर आलेल्या नवीन CCTV फुटेजमुळे तपासात मोठं वळण आले आहे.
राजा आणि सोनम शेवटचं दिसले एका हॉटेलमध्ये
२२ मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज राजा आणि सोनम शिलाँगमधील एका हॉटेलमध्ये चेक-इन करतानाचे आहे. व्हिडीओमध्ये दोघेही स्कूटरवर येताना दिसतात. त्यांनी स्कूटर हॉटेलबाहेर पार्क केली आणि काही सामानासह आत प्रवेश केला. दोघांनी स्कूटरच्या ट्रंकमध्ये एक रेनकोट ठेवलेला देखील दिसतो. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटते, पण सोनम थोडी अस्वस्थ आणि सतत फोनवर असल्याचंही फुटेजमध्ये दिसून येतं.
वीडियो मे आप देख सकते है किस तरह इस अपहरण को एक साज़िश में बदला गया है
— Surendra Sharma Shivpuri (@surendraGmp) June 7, 2025
मेघालय पुलिस को जो सफेद शर्ट मिला है वह शर्ट सोनम में गाड़ी की डिक्की में एक्स्ट्रा रखा है
और जो रेनकोट पुलिस ने घटनास्थल से बरामद किया है वह भी सोनम ने अपनी गाड़ी में रखा है
जिससे यह सिद्ध होता है सोनम अभी… pic.twitter.com/PCxom8COcO
याच फुटेजमध्ये एक संशयास्पद कार देखील त्या हॉटेलबाहेर थांबलेली दिसते. त्या कारमधून उतरलेल्या दोघांपैकी एकजण मास्क घातलेला होता, ज्यामुळे त्याची ओळख पटलेली नाही. मात्र, ही गाडी दोघांचा पाठलाग करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राजाचा मृतदेह सापडला, पत्नी गायब
२३ मे रोजी या जोडप्याचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाले. २४ मे रोजी त्यांची स्कूटर सोहराच्या रिम भागात सापडली. काही दिवसांनी, म्हणजे २७ मे रोजी स्कूटरपासून काही किलोमीटर अंतरावर एका खोल खड्ड्यात राजाचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाजवळ एक तुटलेला मोबाईल स्क्रीनगार्ड आणि धारदार वस्तू ही सापडली आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला असून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सोनम रघुवंशी अजूनही बेपत्ता आहे आणि तिचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी
राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मृताच्या भावाने म्हटलं, "त्याचा मृतदेह स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून २५ किमी दूर सापडतो हेच सांगतं की, त्याला कुणीतरी जबरदस्तीने तिथे नेलं गेलं असावं." त्यांनी संशयित कारमधील व्यक्तींवरही लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.
पोलीस आणि प्रशासन सक्रिय
पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी या प्रकरणाला स्पष्ट हत्या म्हटलं आहे. त्यांनी म्हटले की, "राजा रघुवंशी यांचा खून झाला आहे याबाबत कोणतीही शंका नाही. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि विशेष ऑपरेशन पथक मिळून सोनमचा शोध घेत आहेत."