पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या आंदोलनाने आता मराठी विरुद्ध हिंदी असं वळण घेतल्याचं दिसत आहे. त्यातच राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी जोर लावण्यात येत असल्याने तसेच हिंदी भाषिक परप्रांतीयांची बाजू घेत असल्याने मनसे, शिवसेना ठाकरे गट आदी पक्ष भाजपाविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या वादामध्ये आता काँग्रेसनेही उडी घेतली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांचं मराठीवर प्रेम नाही आहे, तर त्यांचं राजकारणावर प्रेम आहे असं विधान उदित राज यांनी केलं आहे.
मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मिरारोडमधील एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना उदित राज म्हणाले की, राज ठाकरे यांचं मराठीवर प्रेम नाही आहे, तर त्यांचं केवळ राजकारणावर प्रेम आहे. त्यांच्या मुलांनी कुठल्या माध्यमाच्या शाळेमधून शिक्षण घेतलं आहे, याचा जरा शोध घ्या. आदित्य ठाकरेंसारख्या लोकांनी भाषांमध्ये वाद निर्माण करून आपलं साम्राज्य उभं केलं आहे. उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांना मुंबईतून पळवून लावण्याचा इशारा देणे हे काही नवे नाही. मागच्या अनेक वर्षांपासून ते असंच करत आले आहेत. मात्र त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जाग आहेत का? तर राज ठाकरे हे केवळी राजकीय फायद्यासाठी भावना भडकवत आहेत, असा आरोपही उदित राज यांनी केला.
दरम्यान, माझ्या विधानाचा ठाकरे आघाडीशी काही संबंध नाही. राजकीय आघाडी ही वेगळी गोष्ट आहे. मात्र मी वास्तव सांगत आहे. यांच्या घरातील मुले, नातेवाईक कोणत्या भाषेत शिकले, याचा शोध घेतला पाहिजे. यांचं राजकारण हे सुरुवातीपासूनच असं आहे, तसेच त्यावरच यांनी हे संपूर्ण साम्राज्य उभं केलं आहे, ठाकरे गटासोबत आमची राजकीय आघाडी आहे आणि कायम राहील, असेही असे उदित राज म्हणाले.
दरम्यान, मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला असतान प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमी आणि राज ठाकरे यांना डिवचणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यात ते म्हणाले की, गेली ३० वर्षे मुंबईत राहिल्यानंरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्तंय तुमच्यासारख्या लोकांना मराठी मारणाची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला? असं आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.