शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध, नवा छत्तीसगड बनवणार- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 3:42 PM

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जाहीरनाम्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देछत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जाहीरनाम्याची घोषणा भाजपानं जाहीरनाम्यात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिलाडॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वात नव्या छत्तीसगडचे निर्माण करू

रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपानं नवनव्या घोषणा केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजधानी रायपूरमधल्या एका खासगी हॉटेलमधून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपानं जाहीरनाम्यात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिला आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सांगितलं आहे.यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच डॉ. रमण सिंह, कॅबिनेट मंत्री अमर अग्रवाल, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री सारोज पांडेयसह भाजपाचे मोठे नेते उपस्थित होते. याच क्षणी शाह म्हणाले, डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वात नव्या छत्तीसगडचे निर्माण करू. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं आहे. नक्षलवाद्यांना क्रांतीचं माध्यम समजणारा पक्ष छत्तीसगडचं काहीही भलं करणार नाही. भाजपा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून छत्तीसगडमध्ये चौथ्यांदा सत्तेत येईल. आजारी राज्य असलेला छत्तीसगड आता वीज आणि  सिमेंट उत्पादनाचं केंद्र झाला आहे, असंही शाह म्हणाले आहेत. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस शेतक-यांना फक्त व्होट बँक समजते.आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास अंबिकापूर आणि जगदलपूरमध्ये मल्टि स्पेशालिटी रुग्णालय बनवणार आहे. तसेच स्मार्ट कार्ड धारकांना 50 हजारांहून 1 लाख रुपये युनिर्व्हसल हेल्थ स्कीमअंतर्गत देण्यात येणार आहेत. तसेच पत्रकार कल्याण बोर्डाची स्थापना केली जाईल. छत्तीसगडमध्ये फिल्म सिटीचं निर्माण करणार आहे. त्याशिवाय या जाहीरनाम्यात इतरही मुद्द्यांचा समावेश आहे.शेतक-यांचं आधार मूल्य दीड टक्के वाढवण्यात येणार आहे. छोट्या व्यापा-यांना पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देणार आहोत. काँग्रेसनंही काल छत्तीसगड राज्यासाठी घोषणापत्र जाहीर केलं आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी, रोजगार, दारूबंदी, धान्याचं आधार मूल्य 2500 रुपये करणे, बेरोजगारीसह इतर 36 मुद्द्यांचा समावेश आहे. त्यानंतर आज भाजपानं स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Amit Shahअमित शाह