शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"राहुलजी तुमचा लष्करावर विश्वास नाही काय?" लडाख प्रश्नावरून रिजीजूंचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:47 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

ठळक मुद्देचीनने लडाखमधील भारतीय भूमीवर कब्जा केला आहे का? असा राहुल गांधींनी केला होता सवालकुणी व्यक्ती  स्वतःच्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवणे बंद करतो, तेव्हा अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली जातातदरम्यान, पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे

नवी दिल्ली - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्याने सध्या या परिसरात कमालीची तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र दुसरीकडे देशात लडाखमधील परिस्थितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  दरम्यान आता केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधीचे हे विधान बेजबाबदारपणाचे असून, ज्याचा लष्कराच्या क्षमतेवर विश्वास नाही, अशीच व्यक्ती असे विधान करू शकतो, असा टोला लगावला आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. संरक्षणमंत्र्याची हात छाप टिप्पणी पूर्ण झाली असेल तर त्यांनी सांगावे की चीनने लडाखमधील भारतीय भूमीवर कब्जा केला आहे का?

दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावर किरेन रिजिजू यांनी जोरदार पलटवार केला आहे. "जेव्हा राजकीय फायदा हा राष्ट्रहितापेक्षा मोठा वाटू लागतो, तसेच कुणी व्यक्ती  स्वतःच्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवणे बंद करतो, तेव्हा अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली जातात. अपेक्षा करतो की कुणीतरी १९६२ मध्ये केलेल्या चुकांचे आत्मचिंतन करेल,'' अशी बोचरी टीका रिजिजू यांनी केली आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे. चिनी सैन्यानं त्यांची वाहनंदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानंदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्याअमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे

गोष्ट सहा दिवसांच्या युद्धाची; इवलासा देश ठरला होता सात राष्ट्रांना भारीलडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. चिनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यानंतर भारतानंही काही जवानांना माघारी बोलावलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणladakhलडाखIndiaभारतchinaचीन