शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपुरचा वापर ATM प्रमाणे केला, पण मोदींनी...; स्मृती इराणींची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:25 IST

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का?, स्मृती इराणी यांचा सवाल.

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : सध्या मणिपूरमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) प्रचारासाठी मणिपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच मणिपूरचा वापर राहुल गांधींच्या यांनी एटीएमप्रमाणे केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

"राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपूरचा वापर एटीएमप्रमाणे केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरूवात केली. ११ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर आम्ही मणिपूरच्या शेतकऱ्या अतिरिक्त २ हजार रुपये देऊ," अशी घोषणा स्मृती इराणी यांनी केली.

जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवालही त्यांनी केला. पूर्वेकडिल क्षेत्राकडे दुर्लक्ष आण आपलाच खिसा भरण्यासाठी एटीएमप्रमाणे वापर केल्याचा आरोप करत मणिपूरचे भाजप प्रभारी संबित पात्रा (Sambit Patra) आणि स्मृती इराणी यांनी २१ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींच्या निर्धारित रॅलीवर लोकांना बहिष्कार टाकण्यास सांगितलं. 

"काँग्रेस विकास करेल का?"मणिपूरमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या इराणी यांनी शुक्रवारी इम्फाळ पूर्वेतील वांगखेई भागात पारंपारिक काबुई नृत्य करणाऱ्या कलाकारांसोबत नृत्यही केले. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्मृती इराणी भाजपचे उमेदवार ओकराम हेनरी सिंग यांच्या प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. ओकराम हेनरी हे मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांचे पुतणे असून ते वांगखेई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. "काँग्रेस पक्षाला शौचालय बांधता आले नाही. ते भविष्यात तुमच्यासाठी काम करेल आणि विकास करेल अशी तुम्हाला आशा आहे का?," असा सवालही इराणी यांनी केला.  "भाजप राज्यात समृद्धी आणेल""केवळ भाजपच राज्यात समृद्धी आणेल. भाजप २८ फेब्रुवारीनंतर मणिपूरमध्ये पहिलं एम्स आणेल. मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना लॅपटॉप आणि स्कुटी देऊ. गांधी कुटुंबानं मणिपूरमध्ये स्वार्थासाठी राजकारण केलं. इथल्या लोकांना नाकाबंदीचा सामना करावा लागला. या ठिकाणी भविष्य दिसत नसल्यानं लोकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या शहरांमध्ये पाठवावं लागत होतं," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

काँग्रेस सरकारनं मणिपूरसोबत अन्याय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक घरात शौचालय उभारलंय. राजकारणात शौचालय कधीच अजेंड्याचा विषय नव्हता. परंतु मोदींनी असं केलं असल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही निशाणा साधला. डॉ. मनमोहन सिंग हे आसाममधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु आपल्या कार्यकाळादरम्यान ते कधीही मणिपूरला गेले नाही, असं पात्रा म्हणाले.

टॅग्स :Manipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्रा