शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 11:30 IST

Sushant Singh Rajput Suicide: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही शोक व्यक्त करण्यासाठी एक ट्विट केलं होतं. राहुल गांधींचं ते ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यामधून त्यानं आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सुशांत फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सिनेसृष्टीतील कलाकारांसह, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही सुशांतच्या आत्महत्येनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही शोक व्यक्त करण्यासाठी एक ट्विट केलं होतं. राहुल गांधींचं ते ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण यामध्ये एक चूक असल्याचं म्हटलं आहे. सुशांतचा उल्लेख हा अ‍ॅक्टर ऐवजी क्रिकेटर असा करण्यात आल्याचं दिसत आहे. या ट्विटमधील चूक पाहून अनेकजण संतापले आहेत. मात्र हे ट्विट खरं आहे का?, राहुल गांधींनी खरंच सुशांतचा उल्लेख क्रिकेटर असा केला आहे का? हे जाणून घेण्यासाठी या व्हायरल पोस्टमागचं सत्य शोधण्यात आलं. 

राहुल गांधींचं व्हायरल झालेलं हे ट्विट फेक असल्याची माहिती पडताळणीत समोर आली आहे. कोणीतरी मुद्दाम हे केल्याचं दिसून येत आलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुशांतच्या मृत्यूनंतर एक ट्विट केलं होतं. मात्र त्यात सुशांतचा उल्लेख त्यांनी अ‍ॅक्टर असाच केला होता. मात्र त्यांच्या या ट्विटमध्ये कोणीतरी बदल करून क्रिकेटर असा उल्लेख केला आणि ते ट्विट सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. 

'सुशांत सिंह राजपूतचं निधन झाल्याचं ऐकून मला वाईट वाटलं. आपण एक तरुण आणि टॅलेन्टेड अभिनेता गमावला आहे. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांतने रविवारी सकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री त्याने एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्याने फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSushant Singhसुशांत सिंगSuicideआत्महत्याbollywoodबॉलिवूडDeathमृत्यूTwitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरल