पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:14 AM2021-07-24T06:14:00+5:302021-07-24T06:15:04+5:30

मोदी सरकारवर  हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

rahul gandhi targets centre government and claims modi used pegasus against the country | पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य

पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य

googlenewsNext

शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पेगॅससचा प्रयोग केला गेला. राफेल लढाऊ विमान खरेदीची चौकशी थांबवण्यासाठी पेगाससचा प्रयोग केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शस्त्र आमच्या देशाविरोधात वापरले असून त्यासाठी फक्त एकच शब्द आहे ‘देशद्रोह’, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पेगासस पाळतप्रकरणी म्हटले. मोदी सरकारवर  हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. राहुल गांधी यांनी इस्रायलने पेगाससला क्लासिफाइड शस्त्राच्या यादीत ठेवले आहे. ते अतिरेकी आणि गुन्हेगारांसाठी वापरले जाते; परंतु मोदी आणि शहा देशाविरोधातच ते वापरत आहेत, असा आरोप केला.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पेगॅसस पाळतप्रकरणी विचारले की, पेगॅसस सॉफ्टवेअर सरकार किंवा सरकारच्या कोणत्या एजन्सीने विकत घेतले आहे का? जर सरकारने विकत घेतले असेल तर जे सॉफ्टवेअर दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या लोकांवर वापरले जायला हवे ते आपलेच अधिकारी, आपलेच राजकीय नेते, आपल्याच पक्षाचे नेते, पत्रकार, कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित लोकांवर वापरले गेले? जर सरकारने वापरले नाही तर मग सरकारने हेरगिरी केली.

पाळतीविरोधात दिल्या घोषणा

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, पी. चिदम्बरम, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाच्या बहुतांश खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी पाळतीच्या विरोधात घोषणा दिल्या.
 

Web Title: rahul gandhi targets centre government and claims modi used pegasus against the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.