कशी बायको हवीये? लग्नाच्या प्रश्नावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:00 IST2022-12-28T18:59:51+5:302022-12-28T19:00:43+5:30

'माझ्या आयुष्यातील पहिले प्रेम इंदिरा गांधी आहेत.'

Rahul Gandhi Talks About Marriage | Rahul Gandhi spoke for the first time on his marriage | कशी बायको हवीये? लग्नाच्या प्रश्नावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले...

कशी बायको हवीये? लग्नाच्या प्रश्नावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले...


मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन महिन्यांपूर्वी सुरू केलीली 'भारत जोडो यात्रा' राजधानी दिल्लीत पोहचली असून, यात्रेने सध्या ब्रेक घेतला आहे. यावेळी राहुल गांधी पक्षाच्या 138व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामील झाले. तत्पूर्वी, राहुल गांधींनी पहिल्यांदाच आपल्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली पत्नी कशी असावी, याबाबत खुलासा केला.

कशी पत्नी हवीये...?
मॅशेबल इंडिया या यूट्यूब चॅनलच्या बॉम्बे जर्नी स्पेशल एपिसोडसाठी राहुल गांधींनी मुलाखत दिली. यावेळी राहुल गांधींना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राहुल म्हणाले की, माझ्या आयुष्यातील पहिले प्रेम इंदिरा गांधी आहेत. यावर त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला की, तुम्हाला अशा स्त्रीशी लग्न करायचे आहे का, ज्यात तुमच्या आजीसारखे गुण असतील? यावर राहुल म्हणाले- हा एक मनोरंजक प्रश्न आहे. मला अशी स्त्री हवी आहे, जिच्यात माझी आई आणि आजी दोघींचेही गुण असतील.

पप्पू म्हटल्यावर राग येतो?
राहुल गांधी यांना अनेकदा पप्पू म्हटले जाते. याबाबत विचारले असता, राहुल म्हणाले- नाही, ही त्यांची प्रचाराची पद्धत आहे. त्यांच्या मनात भीती आहे, त्यामुळेच ते असे म्हणतात, असे उत्तर राहुल यांनी दिले. 
 

Web Title: Rahul Gandhi Talks About Marriage | Rahul Gandhi spoke for the first time on his marriage