शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 5:07 PM

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

रांची: सर्व चोरांची नावं मोदीच का असतात? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी. मला एक गोष्ट सांगा. सर्व चोरांची नावं मोदीच का असतात?', असा प्रश्न करत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राफेलच्या मुद्यावरुन मोदींवर कडाडून टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल प्रथमच झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राइक आणि राफेल करार यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. 'भारतीय हवाई दल देशाचं रक्षण करतं. देशाच्या संरक्षणासाठी हवाई दलाचे वैमानिक बलिदान देतात. मात्र आमचे पंतप्रधान हवाई दलाचा पैसा अनिल अंबानींच्या खिशात घालतात,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नावं घेत सर्व चोरांची नावं मोदीच का असतात, असा सवाल त्यांनी विचारला. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच झारखंडचा दौरा करत आहेत. यासाठी आज ते दुपारी दिल्लीहून झारखंडला पोहोचले. यानंतर त्यांनी रांचीतील मोरहाबादी मैदानात जनसभेला संबोधित केलं. त्याआधी त्यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. राहुल यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जनसभेला संबोधित करण्याआधी त्यांनी आदिवासींची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत नृत्यही केलं. राहुल गांधींच्या सभेवेळी मंचावर माजी मुख्यमंत्री आणि झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख बाबुलाल मरांडी उपस्थित होते. मात्र या सभेला झारखंड विकास मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन उपस्थित नव्हते. राहुल यांच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. राहुल यांच्या जनसभेआधी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी यात्रा काढली. त्यांच्या सभेला काँग्रेससह झारखंड विकास मोर्चा आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलLalit Modiललित मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीNirav Modiनीरव मोदीindian air forceभारतीय हवाई दल