Video : लॉकडाउन फेल, आता पुढे काय? मोदी सरकारला राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:03 PM2020-05-26T13:03:58+5:302020-05-26T13:16:23+5:30

राहुल गांधी म्हणाले, लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले, परिणाम मिळाले नाहीत. अशात, सरकारला विचारण्याची आमची इच्छा आहे, आता सरकार पुढे काय करणार ? कारण लॉकडाउन फेल ठरले आहे.

Rahul gandhi said lockdown failed in india amid corona crisis sna | Video : लॉकडाउन फेल, आता पुढे काय? मोदी सरकारला राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

Video : लॉकडाउन फेल, आता पुढे काय? मोदी सरकारला राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

Next
ठळक मुद्देराहुल गांधी म्हणाले, लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले, परिणाम मिळाले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत? राहुल गांधींचा प्रश्नदेशभरात कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 45 हजारवर

नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला. यावेळी लॉकडाउन फेल झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते, की आपण 21 दिवसांत कोरोना व्हायरसवर मात करू, मात्र आता 60 दिवस झाले आहेत. आता तर देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.  लॉकडाउनही काढला जात आहे. लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे फेल ठरला आहे.

राहुल गांधी म्हणाले, लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले, परिणाम मिळाले नाहीत. अशात, सरकारला विचारण्याची आमची इच्छा आहे, आता सरकार पुढे काय करणार ? कारण लॉकडाउन फेल ठरले आहे.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला, की संपूर्ण जग लॉकडाउन हटवत असताना तेथील कोरोना केसेसे कमी होत आहेत. मात्र, आपल्याकडे केस वाढत आहेत. यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला.

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात

काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल.

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 45 हजारवर -
देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 1 लाख 45 हजारच्याही पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या माहितीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झाली आहे. यापैकी 4 हजार 167 जणांचा मृत्यू झाला. तर 60 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

देशात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार 535 नवे कोरोना रुग्ण आढलून आले. तर 146 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 80 हजारहून अधिक आहे. 

Read in English

Web Title: Rahul gandhi said lockdown failed in india amid corona crisis sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.