Rahul Gandhi : शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:58 IST2026-03-10T14:57:40+5:302026-03-10T14:58:27+5:30

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्यावर तेथील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला.

Rahul Gandhi reaches sonipat to attend wedding in farmer daughter video viral | Rahul Gandhi : शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद

Rahul Gandhi : शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद

सोनिपत जिल्ह्यातील गोहाना भागातील मदिना गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्यावर तेथील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. शेतकरी संजय मलिक यांच्या मुलीच्या लग्नात नववधूला आशीर्वाद देण्यासाठी राहुल गांधी घरी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी शेतकरी संजय मलिक यांना फोन आला होता की, राहुल गांधी त्यांच्या मुलीच्या लग्नाला येणार आहेत. त्यानंतर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राहुल गांधी आपल्या ताफ्यासह मदिना गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबासोबत एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला.

राहुल गांधी यांनी शेतकरी संजय मलिक, त्यांची मुलगी तन्नू मलिक आणि संपूर्ण कुटुंबाची अतिशय साधेपणाने भेट घेतली. त्यांनी नववधूला आशीर्वाद दिला आणि कुटुंबासोबत बसून भोजनाचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी लग्नातील पारंपरिक पदार्थ जिलेबी, लाडू यांचा आस्वाद घेतला.

राहुल गांधी यांना आपल्या घरी पाहून कुटुंबीय अत्यंत आनंदी झालं. "एका छोट्या शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी, दिल्लीतील लोकसभा अधिवेशनाच्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून ते आले, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे" अशा भावना कुटुंबाने व्यक्त केल्या.

संजय मलिक आणि त्यांचे भाऊ बलजीत मलिक काही दिवसांपूर्वी लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला राहुल गांधींकडे गेले होते. त्यावेळी राहुल गांधींनी लग्नाला नक्की येईन असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी आपला शब्द पाळला. यावेळी रोहतकचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा देखील राहुल गांधींसोबत उपस्थित होते.

Web Title : राहुल गांधी ने किसान की बेटी के विवाह में पहुंचकर दिया सरप्राइज, आशीर्वाद।

Web Summary : राहुल गांधी ने हरियाणा में किसान संजय मलिक की बेटी की शादी में अचानक पहुंचकर नवविवाहित जोड़े को आशीर्वाद दिया। उन्होंने परिवार के साथ एक घंटे से अधिक समय बिताया, पारंपरिक मिठाई का भोजन किया और दिल्ली में निमंत्रण मिलने के बाद आने का अपना वादा निभाया।

Web Title : Rahul Gandhi surprises farmer's daughter at wedding, offers blessings.

Web Summary : Rahul Gandhi made a surprise visit to farmer Sanjay Malik's daughter's wedding in Haryana, blessing the newlywed. He spent over an hour with the family, sharing a meal of traditional sweets and fulfilling his promise to attend after receiving the invitation in Delhi.