शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 20:44 IST

Bharat Jodo Yatra : "आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत, कारण..."

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर म्हणजेच आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींनी हरियाणातील कुरुक्षेत्रातून आरएसएसचे लोक म्हणजे, 21व्या शतकातील कौरव असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, "21 व्या शतकातील कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि शाखा चालवतात. त्यांच्यामागे देशातील 2-3 श्रीमंत लोक उभे आहेत."

राहुल गांधी म्हणाले, 'आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत. कारण भगवान शिव हे तपस्वी होते आणि हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. या लोकांनी जय सिया राममधून माता सीतेलाच बाजूला केले. हे लोक भारतीय संस्कृतीविरोधात काम करत आहेत.' एवढेच नाही, तर पांडवांनी कधीही कुणाचे वाईट केले नव्हते. आमच्या भारत जोडो यात्रेत कुणाला धर्म विचारला गेला नाही, असेही राहुल यावेळी म्हणाले.

RSS वर हल्लाबोल -राहुल गांधी यांची भारत जेडो यात्रा सध्या कुरुक्षेत्रात आहे. ते रविवारी म्हणाले होते, "भारत जोडो यात्रा ही बेरोजगारी आणि महागाईबरोबरच समाजात द्वेष आणि भीती पसरवण्याच्या विरोधात आहे. राहुल गांधी म्हणाले, आम्ही हिच्याकडे एक तपस्या म्हणून पाहत आहोत. काँग्रेसचा 'तपस्ये'वर विश्वास आहे तर भाजप पूजेची संघटना आहे. भाजप आणि आरएसएस 'तपस्ये'चा आदर करत नाहीत. तर जे त्यांची पूजा करतात त्यांचाच सन्मान व्हावा अशी त्यांची इच्छा असते, असेही राहुल म्हणाले होते."

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ