'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:52 IST2025-08-27T16:51:02+5:302025-08-27T16:52:05+5:30
Rahul Gandhi on Operation Sindoor: राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधातील कारवाई थांबवल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
Rahul Gandhi on Operation Sindoor: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी(दि.२७) बिहारमधील मुझफ्फरपूर येथील 'मतदार हक्क यात्रे'तून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत राहुल म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरुन नरेंद्र मोदींनी पाकिस्तानविरोधातील कारवाई थांबवली.'
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले, 'ट्रम्प म्हणाले होते की, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा मी नरेंद्र मोदींना फोन केला आणि त्यांना सांगितले की, २४ तासांच्या आत युद्ध थांबवा. पण, नरेंद्र मोदींनी २४ नाही, फक्त ५ तासांत पाकिस्तानविरोधातील कारवाई थांबवली.' यावर अद्याप भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
#WATCH | Muzaffarpur, Bihar | Addressing during the 'Voter Adhikar Yatra', Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Trump said today that when the war between India and Pakistan was going on, I picked up the phone and told Narendra Modi and told him to stop whatever he was doing within… pic.twitter.com/ap4ih0Ruqt
— ANI (@ANI) August 27, 2025
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पुन्हा एकदा दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी त्यांच्या हस्तक्षेपामुळे थांबला. ट्रम्प म्हणतात की, त्यांनी व्यापार आणि शुल्काची धमकी देऊन मोदींना युद्धविराम करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी हा दावा ४० हून अधिक वेळा केला आहे. मात्र, प्रत्येकवेळी भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानने विनवणी केल्यामुळेच युद्ध थांबवल्याचे भारताचे म्हणने आहे.
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केले की, कोणत्याही देशाचा नेता भारताला त्यांची लष्करी कारवाई कधी थांबवायची, हे सांगू शकत नाही. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्याचा निर्णय स्वतःहून घेतला, कोणत्याही बाह्य दबावाखाली नाही.