शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

'राहुल गांधी फक्त हिंदू नाहीत, जानवेधारी हिंदू आहेत' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 21:43 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गुजरातमधील सोमनाथ मंदिरात 'अहिंदू' अशी नोंद झाल्यानंतर सुरू झालेल्या वादावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे.

अहमदाबाद -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गुजरातमधील सोमनाथ मंदिरात 'अहिंदू' अशी नोंद झाल्यानंतर सुरू झालेल्या वादावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ हिंदू नसून ते जानवेधारी हिंदू आहेत असे वक्तव्य करत काँग्रेसचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणाला भाजपला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी यांची अहिंदू म्हणून रजिस्टरमध्ये नोंद होण्यामागे भाजपचा हात असल्याचा थेट आरोपच सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राहुल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक मंदिरांना भेटी देऊन तेथील हिंदुंची मत वळवण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे. बुधवारीही ते अहमद पटेल यांच्यासमवेत सोमनाथ मंदिरात गेले होते. त्यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू (Non-Hindu) या रकान्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नोंदीपुढे राहुल यांची सही नसून ही नोंद माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

(आणखी वाचा - गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका )

भारतीय जनता पक्षाने इतक्या खालच्या स्तरावर जायला नको होते, असे म्हणत सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, रजिस्टरमध्ये नोंद झालेले अक्षरही राहुल गांधींचे नाही, आणि ज्यावर राहुल गांधींनी सही केली ते रजिस्टरही मूळ रजिस्टर नाही. मंदिर प्रवेशावेळी रजिस्टर राहुल गांधींना देण्यात आलेले रजिस्टर वेगळेच होते.

(आणखी वाचा - राहुल गांधी हिंदू की ख्रिश्चन? सोशल मीडियावर धुमाकूळ )

या सगळ्या वादानंतर काँग्रेसने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळून लावले. राहुल गांधी यांनी अभ्यागत वहीत स्वत:ची सही केलीच नव्हती. त्यामुळे इतरांकडून दावा करण्यात येत असलेली अभ्यागत वही खोटी आहे. राहुल गांधी यांची शंकरावर खूप श्रद्धा आहे. त्यांचा सत्यावरही तेवढाच विश्वास आहे. अडचणीच्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपने हे कुंभाड रचल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते दीपेंदर सिंह हुडा यांनी केला. यावेळी हुडा यांनी राहुल यांची स्वाक्षरी असलेली सोमनाथ मंदिरातील अभ्यागत वहीची प्रतही पत्रकारांना दाखवली. ज्या अभ्यागत वहीवरून हा वाद निर्माण झाला आहे त्यामध्ये राहुल यांची स्वाक्षरी ‘राहुल गांधी जी’ अशी असल्याचेही हुडा यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. राहुल गांधी स्वत:च्याच नावापुढे ‘जी’ का लावतील? भाजपनेच लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणल्याचेही हुडा यांनी सांगितले. 

( आणखी वाचा  - गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी )

राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन यावरून याआधी देखील वादळ निर्माण झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने राहुल गांधी  यांचं पालनपोषण सोनिया गांधी यांनी ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे केल्याचा उल्लेख केला होता. यावर राहुल गांधी यांनी खुलासा केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी जाहीरपणे आपला धर्म सांगण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. त्यांचा दावा हा सेक्युलर आचारसरणीचा आहे, मात्र सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा धर्म कुठला यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सोमनाथ मंदिरातल्या त्या नोंदीमुळे त्यात भर पडली आहे. दरम्यान,  ट्विटरवर RagaSomnathSelfGoal हा हॅशटॅग अव्वलस्थानी असून एकच चर्चा आहे, ती म्हणजे राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन? 

पाहा  काँग्रेसची पत्रकार परिषद - 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा