गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 06:35 PM2017-11-29T18:35:48+5:302017-11-29T23:15:24+5:30

182 जागा असलेल्या गुजरातमधील एक मतदारसंघ असा आहे जिथे ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो तो सत्तेत असतोच. एकप्रकारे गुजरात राज्याची गुरुकिल्लीच या मतदार संघाकडे आहे....

Want to establish power in Gujarat? Just win this one place | गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका

गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका

googlenewsNext

अहमदाबाद - सध्या गुजरातमध्ये निवडणूक प्रचार ऐन रंगात आला आहे. 18 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये कोणचं सरकार येणार हे फिक्स होईल. पण जर गुजरातच्या निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकल्यास एक वेगळीच माहिती समोर आली आहे. 182 जागा असलेल्या गुजरातमधील एक मतदारसंघ असा आहे जिथे ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो तो सत्तेत असतोच. एकप्रकारे गुजरात राज्याची गुरुकिल्लीच या मतदार संघाकडे आहे असे म्हटल्यास वावगे वाटायला नको.  गुजरातमधील ‘वलसाड’ हा मतदारसंघ असा आहे. 1975 पासून या मतदार संघातील उमेदवारानं सत्ता उपभोगली आहे. 

‘वलसाड’मध्ये ज्या पक्षाचा उमेदवार निवडणूक येतो तो गांधीनगर मतदार संघावर कब्जा मिळवतोच. तुम्ही म्हणाल हा एक योगायोग असू शकतो, पण या जागेचा इतिहास हेच सांगतो. गेल्या 42 वर्षात जेवढ्या विधानसभा निवडणूका झाल्या त्यामध्ये वलसाडमध्ये ज्या पार्टीचा उमेदवार जिंकतो ती पार्टी सत्तेत येतेच. 

(आणखी वाचा - राहुल गांधी हिंदू की ख्रिश्चन? सोशल मीडियावर धुमाकूळ ) 

1975 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे केशवभाई रतनजी पटेल यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसनं आघाडी करत सरकार स्थापन केलं होत. त्यावेळी बाबू बाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. 1980 मध्ये काँग्रेसच्या दौलतभाई नाथूभाई देसाई यांनी वलसाडमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळीही काँग्रेसनं सरकार स्थापन केलं होतं. 1785मध्ये काँग्रेसकडून बरजोरजी पारडीवाला यांनी निवडणूक जिंकली होती. त्यावेळीही काँग्रेसनं राज्यात सत्ता स्थापन केली होती.

( आणखी वाचा  - गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी ) 

1992मध्ये भाजपानं दौलत देसाई यांना वलसाडमध्ये उमेदवारी दिली. दौलत देसाईनं यावेळी विजय मिळवला. भाजपानं जनता दलाच्या सहायाने गुजरातमध्ये सत्ता स्थापन केली. त्यानंतर 1995मध्येही दौलत देसाईनं वलसाड जिंकले आणि केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वात भाजपानं सरकार स्थापन केलं.  त्यानंतर 1998, 2002 आणि 2007 मध्येही दौलत देसाई यांनी भाजपाकडून वलसाडमध्ये आपला जलवा कायम राखत विजय मिळवला आणि गुजरातमध्ये भाजपानं आपली सत्ताही कायम राखली. 2012मध्ये भाजपानं दौलत देसाईच्या ऐवजी भरतभाई कीकूभाई पटेल यांना उमेदवारी दिली. भरतभाई कीकूभाई पटेल यांनीही गुजरातमध्ये विजय मिळवला. आणि गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपानं सरकार स्थापन केलं. 

यावेळी भरत पटेल - नरेंद्र टंडेल यांच्यात होणार सामना - 
2012मध्ये भाजपाच्या भरतभाई कीकूभाई पटेल यांनी 93658 मते मिळवत धर्मेश पटेल याचा पराभव केला होता.  या येवेळी भाजपानं भरत पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची गुजरात राज्यात चांगली पकड आहे. काँग्रेसनं गेल्या निवडणूकीतील पराभवातून बोध घेत नरेंद्र टंडेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगली पकड आहे. त्यामुळे दोन तुल्यबळ उमेदवारातून वलसाड कोण जिंकणार आणि सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात हे पाहण औस्तुक्याचं ठरलेय. 
 

Web Title: Want to establish power in Gujarat? Just win this one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.