Gujarat Elections 2017: The BJP candidate has 155 trains, while the Congress candidate has 4.5 crores car | गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी

अहमदाबाद - गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगताना पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या या ऐन रणधुमाळीत भाजपाच्या एका उमेदवाराची संपत्तीची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील जामनगर (उत्तर) येथील भाजपाचे उमेदवार धर्मेंद्र जाडेजा यांच्या नावावर 155 गाड्या आहेत. त्यांच्याकडे एकूण 8.75 कोटी रुपयांच्या गाड्या असून यातील, केवळ पाच गाड्याचा ते वापर करतात, उर्वरित गाड्याचा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसाठी उपयोग होतो. याबद्दलची माहिती दैनिक भास्करनं दिली आहे.  

राजकोट पश्चिमचे काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरु महागड्या गाड्यांचे शौकीन असून त्यांनी अलीकडेच 4.5 कोटींची लेम्बोर्गिनी खरेदी केली आहे, ही कार त्यांच्या मुलीच्या नावे आहे. राजगुरु यांच्याकडे विविध प्रकारचे अनेक गाड्या आहेत. 12 वी पास इंद्रनील राजगुरुची एकूण संपत्ती 141 कोटींची आहे. 

कॉंग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांच्याजवळ एकूण 28 कोटींच्या गाड्या आहेत. ज्यामध्ये लेम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू, लँन्ड रोवर आणि फॉक्सवेगनसारख्या महागड्या कार आहेत.  लेम्बोर्गिनी कारची किंमत 4.5 कोटी रुपये सांगितली होती. त्यांच्या गाड्यांची एक खासियत म्हणजे नोंदणी क्रमांकाच्या शेवटी नेहमी 99 संख्या असते.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे दोन कार…
राजकोट पश्चिमेकडून निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री विजय रूपाणी याच्यांकडे इनोवा आणि त्यांच्या पत्नीकडे मारुती वैगन-आर कार आहे. या दोन्ही गाड्यांची किंमत 17 लाख आहे. भाजप उमेदवार वीरेंद्र जाडेजा यांच्या जवळ 50 हजाराचे 2 घोडे आणि 55 हजारांची बैलगाड़ी आहे. 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.