राहुल गांधींनी स्वतःच्या हाताने बनवली ‘इमरती’, ‘बेसनाचे लाडू’; दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 07:31 IST2025-10-21T07:27:47+5:302025-10-21T07:31:23+5:30
राहुल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला.

राहुल गांधींनी स्वतःच्या हाताने बनवली ‘इमरती’, ‘बेसनाचे लाडू’; दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या
नवी दिल्ली : दिल्लीतील प्रसिद्ध घंटेवाला मिठाईच्या दुकानात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वत:च्या हाताने ‘इमरती’ आणि ‘बेसन लाडू’ बनविले.
त्या घटनेचा व्हिडीओ त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक दिवाळी कशी उत्तम साजरी करत आहेत हे आवर्जून शेअर करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे व त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राहुल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला.
पुरानी दिल्ली की मशहूर और ऐतिहासिक घंटेवाला मिठाइयों की दुकान पर इमरती और बेसन के लड्डू बनाने में हाथ आज़माया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 20, 2025
सदियों पुरानी इस प्रतिष्ठित दुकान की मिठास आज भी वही है - ख़ालिस, पारंपरिक और दिल को छू लेने वाली।
दीपावली की असली मिठास सिर्फ़ थाली में नहीं, बल्कि रिश्तों और समाज… pic.twitter.com/bVWwa2aetJ