शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:53 IST

राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

काँग्रेस खासदार तथा लोकसभेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै 2024) हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटताना दिसत आहे. या वक्तव्यासंदर्भात त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याशिवाय, भाजपने हा मुद्दा हिंदू विरुद्ध राहुल गांधी असा बनवला आहे. तर दुसरीकडे आपण आपल्या वक्तव्यावर कायम आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यातच आता, जगतगुरू रामभद्राचार्य यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

"राहुल गांधींना अभय मुद्रेसंदर्भात ज्ञान नाही" -रामभद्राचार्य म्हणाले, "राहुल गांधींना अभय मुद्रेसंदर्भात ज्ञान नाही. मी सांगतो अभय मुद्रा काय असते ते. कँग्रेसने शिखांच्या हत्या केल्या. काँग्रेसने कितीतरी हिंसाचार केला आहे. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी चांगले व्यक्ती होते. ते माझेही चांगले मित्र होते. जर राहुल गांधींनी सभ्यता दाखवली, तर मी त्यांना बरेच काही समजावून सांगू शकतो."

'अयोध्योत झालेली चूक दुरुस्त करू' -उत्तर प्रदेश आणि अयोध्येत भाजपचे जे नुकसान झाले, त्यावर बोलताना राममभद्राचार्य म्हणाले, भाजपचा उत्तर प्रदेशात पराभव झाला, कारण त्यांना विरोधकांच्या खोट्या प्रचाराला काउंटर करता आले नाही. विरोधक सातत्याने संविधान आणि आरक्षणासंदर्भात खोटा प्रचार करत होते. भाजपला याचा सामना करता आला नाही. एवढेच नाही, तर अयोध्येत झालेल्या पराभवासंदर्भात बोलायचे झाल्यास, अयोध्येत जी चूक झाली, ती दुरुस्त केली जाईल," असेही रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ayodhyaअयोध्याHinduहिंदू