राहुल गांधी अमेठीतून, प्रियांका वाराणसीतून? निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 06:34 IST2023-08-19T06:33:17+5:302023-08-19T06:34:47+5:30

राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

rahul gandhi from amethi and priyanka gandhi from varanasi big announcement about contesting elections | राहुल गांधी अमेठीतून, प्रियांका वाराणसीतून? निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा

राहुल गांधी अमेठीतून, प्रियांका वाराणसीतून? निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा

राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : काही तासांपूर्वीच उत्तर प्रदेशकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले अजय राय यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

राय यांनी सांगितले की, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील. प्रियांका गांधी यांची इच्छा असल्यास वाराणसीतील प्रत्येक पक्ष कार्यकर्ता कामाला लागेल. म्हणजेच प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात. हा दावा करताना अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, सध्या केंद्रीय मंत्री व अमेठीच्या खासदार अस्वस्थ आहेत व जनतेला आता उत्तर पाहिजे. अमेठीच्या विकासासाठी त्यांनी काय केले? आतापर्यंत काही केले नाही. 

अमेठीतून याआधी संजय गांधी,  राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनीही सलग तीन वेळा अमेठीतून निवडणूक जिंकली होती.


 

Web Title: rahul gandhi from amethi and priyanka gandhi from varanasi big announcement about contesting elections