अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध होताच राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता; सरकारला केले मोठे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 18:10 IST2026-02-28T18:10:39+5:302026-02-28T18:10:51+5:30
Rahul Gandhi On America Israel Iran War: अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वेगाने वाढणारे शत्रुत्व अत्यंत चिंताजनक आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध होताच राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता; सरकारला केले मोठे आवाहन
Rahul Gandhi On America Israel Iran War: मध्य-पूर्वेत संघर्षाचा भडका उडाला आहे. इस्रायलने शनिवारी इराणविरोधात सैन्य कारवाई सुरू केली. अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील या युद्धामुळे तणाव वाढला आहे. यानंतर आता इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलवर अत्यंत भीषण हल्ले चढवले आहेत. इराणने आतापर्यंत ७० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली आहेत. इस्रायली संरक्षण दलाने या हल्ल्याची पुष्टी केली असून संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी केला आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत भारत सरकारला आवाहन केला आहे.
या युद्धाचे स्वरूप आता अधिक व्यापक होत चालले आहे. इराणच्या समर्थनार्थ येमेनमधून हूती बंडखोरांनी लाल समुद्रात आणि इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाइल्स डागली आहेत. तसेच लेबनॉनमधून हिजबुल्लानेही हल्ले सुरू केले आहेत. बेरूतला कोणत्याही युद्धाच्या आगीत ओढले जाऊ देणार नाही, असा इशारा लेबनॉनच्या पंतप्रधानांनी हिजबुल्लाला दिला आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे समर्थक गट अधिक आक्रमक झाल्याने, या युद्धाची दाहकता अधिकच वाढली आहे.
वेगाने वाढणारे शत्रुत्व अत्यंत चिंताजनक
राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणतात की, अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वेगाने वाढणारे शत्रुत्व अत्यंत चिंताजनक आहे. मध्य पूर्वेतील प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. मी भारत सरकारला आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्वरित आणि सक्रिय उपाययोजना करण्याचे आवाहन करतो.
दरम्यान, पंतप्रधानांचे विमान हवेत असते आणि असा हल्ला झाला तर याला कोण जबाबदार ठरले असते? पंतप्रधानांनी देशाला सांगावे की इस्रायल इराणवर हल्ला करणार आहे, असे नेतन्याहू यांनी त्यांना कळवले होते का? जर त्यांनी तसे केले होते, तर पंतप्रधानांनी ताबडतोब त्यांचा दौरा संपवून देशात परतायला हवे होते. इस्रायलने तसे सांगितले नसेल की अमेरिकेच्या सहकार्याने इराणवर हल्ला करत आहेत, तर इस्रायलने आमचा विश्वासघात केला आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या भेटीचा वापर इराणवर हल्ला करण्यासाठी आणि गाझामध्ये पॅलेस्टिनींवर झालेल्या नरसंहाराला लपवण्यासाठी केला आहे. यामुळे हा संदेश जाईल की भारत इराणसोबत नाही तर इस्रायलसोबत आहे. या हल्ल्यातून भारताला काय मिळत आहे? अशी विचारणा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
The rapidly escalating hostilities between US-Israel and Iran are deeply concerning.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 28, 2026
The safety and security of every Indian citizen across the Middle East must be our highest priority.
I urge the Government of India to take immediate and proactive measures to safeguard our…