राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:40 IST2025-05-14T14:39:25+5:302025-05-14T14:40:11+5:30
Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाशी संबंधित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Rahul Gandhi Citizenship Dispute Case Rejected: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याचिकाकर्त्याला पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
Allahabad High Court refuses to entertain PIL to revoke Rahul Gandhi's Indian citizenship
— Bar and Bench (@barandbench) May 14, 2025
This is the third petition filed by the same man challenging Gandhi's citizenship.@RahulGandhi
Read more: https://t.co/gHwGGScWXwpic.twitter.com/PxjEnD09oR
मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी याच वादावरील याचिकाकर्त्याची याचिका उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळून लावली होती. नवीन याचिका दाखल करताना, काही नवीन पुरावे सादर केल्याचा दावाही करण्यात आला. या याचिकेवर निर्णय होईपर्यंत राहुल गांधींच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
कोणी दाखल केली याचिका?
ही याचिका कर्नाटकातील एस विघ्नेश शिशिर यांनी दाखल केली होती. शिशिर यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी केली होती. राहुल गांधींकडे युनायटेड किंग्डम (यूके) चे नागरिकत्व आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.