शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:41 IST

Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली.

Rahul Gandhi Citizenship :राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अहवाल देण्यास सांगितले आहे. या अहवालाद्वारे राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत की नाहीत? याचे उत्तर देण्यासही उच्च न्यायालयाने सांगितले आहे. यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला 10 दिवसांची मुदत दिली आहे. 

राहुल गांधींकडे भारत आणि ब्रिटन, असे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप आहे. अनेक वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारला राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल आणि 10 दिवसांच्या आत न्यायालयाला कळवावे लागेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होईल.

केंद्राने अहवाल दाखल केला आज केंद्र सरकारने एक स्टेटस रिपोर्ट दाखल केला. पण न्यायालयाने त्याला पुरेसे मानले नाही. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, राहुल गांधी यांचे नागरिकत्व संशयास्पद आहे. या आधारावर त्यांच्या लोकसभा सदस्यत्वालाही आव्हान देण्यात आले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला 10 दिवसांच्या आत तथ्यांसह उत्तर देण्यास सांगितले आहे. 

2019 मध्ये SC ने खटला फेटाळून लावलाविशेष म्हणजे, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचे आरोप फेटाळून लावले होते. कंपनीच्या कागदपत्रांमध्ये केवळ ब्रिटिश नागरिकत्वाचा उल्लेख केल्याने राहुल गांधी ब्रिटिश नागरिक ठरत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर 2024 आणि 2025 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्ते एस. विघ्नेश शिशिर यांनी दावा केला की, त्यांच्याकडे ब्रिटिश सरकारची कागदपत्रे आणि ईमेल आहेत, जे राहुल गांधींचे ब्रिटिश नागरिकत्व सिद्ध करतात. पुढील सुनावणीत काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाHigh Courtउच्च न्यायालय