शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra :'मी गुलाम नबी आझाद यांची माफी मागतो; दिग्विजय सिंह यांच्या विधानाशी सहमत नाही'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:11 IST

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकचा पुरुवा मागितला आहे.

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला आहे. पण, राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्याला सहमत नसल्याचे म्हटले आहे. 'दिग्विजय सिंह जे बोलले त्याच्याशी मी सहमत नाही. माझा लष्करावर पूर्ण विश्वास आहे. भारतीय लष्कर कोणतेही ऑपरेशन करण्यास सक्षम आहे, त्याचा पुरावे देण्याची गरज नाही' असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

काय म्हणाले दिग्विजय सिंह?दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला होता. 'पुलवामामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. तेव्हा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना सर्व जवानांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती, पण मोदींनी ते मान्य केले नाही. आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावाही दाखवला नाही,' असे वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले होते.

हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक विधान राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान राहुल गांधी यांना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या विधानाशी मी सहमत नाही. माझा देशाच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे.'

गुलाम नबींची माफी मागितलीएवढंच नाही तर राहुल यांनी यावेळी काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांची माफीही मागितली. भारत जोडो यात्रेसाठी गुलाम नबी आझाद यांना निमंत्रित न करण्याबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, 'गुलाम नबी आझाद यांच्या पक्षातील बहुतांश लोक आमच्यासोबत बसले होते. 90 टक्के लोकांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केलाय. त्या बाजूला फक्त गुलाम नबी राहिले आहेत. मी गुलाम नबी आझाद यांचा आदर करतो. माझ्यामुळे त्यांना दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागतो.' गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आता त्यांच्या पक्षातील बहुतांश नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेस