Rahul Gandhi : Video - "संकट आपल्या दारात, LPG, पेट्रोलच्या किमती..."; राहुल गांधींचं सरकारवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:47 IST2026-03-12T16:46:41+5:302026-03-12T16:47:38+5:30
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi : Video - "संकट आपल्या दारात, LPG, पेट्रोलच्या किमती..."; राहुल गांधींचं सरकारवर टीकास्त्र
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, जग झपाट्याने बदलत असून संकट आता आपल्या दारात येऊन उभं राहिलं आहे. जर सरकारने त्वरित कठोर पावलं उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात कोट्यवधी कुटुंबांना समस्यांचा सामना करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, जर वेळेत लक्ष दिलं नाही, तर एलपीजी सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सामान्य माणसासाठी सर्वात मोठी समस्या बनतील. सरकारवर थेट निशाणा साधताना त्यांनी आरोप केला की, सत्य आता सर्वांसमोर आलं आहे; पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देश आता अडचणीत येत असल्याचं त्यांचं मत आहे.
केवळ महागाईच नव्हे, तर सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी ताशेरे ओढले. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी म्हटलं की, कमकुवत आणि दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळेच आज भारतावर ही धोकादायक वेळ आली आहे. आता सत्य सांगण्याची आणि भविष्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे, अन्यथा याचा थेट फटका देशातील सामान्य जनतेला सहन करावा लागेल, असं आवाहन राहुल यांनी देशवासीयांना केलं आहे.
दुनिया तेज़ी से बदल रही है। संकट हमारे दरवाज़े पर है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 12, 2026
अगर सरकार ने तुरंत कदम नहीं उठाए, तो LPG, पेट्रोल और डीज़ल करोड़ों भारतीय परिवारों के लिए बड़ी समस्या बन जाएंगे।
सच्चाई साफ़ है - Compromised PM Modi ji ने भारत की ऊर्जा सुरक्षा से समझौता कर दिया है।
कमज़ोर और दिशाहीन विदेश… pic.twitter.com/uQgSN4GGdx