शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 13:06 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकार सतत सरकारी उपक्रमांत (PSUs) आपली भागीदारी विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. सीतारमण यांनी खासगीकरण करण्यात येणाऱ्या २३ सरकारी कंपन्या कोणत्या आहेत, याबाबत काहीच सांगितले नव्हते. मात्र, सरकार आपली भागीदारी २३ नव्हे तर २६ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील विकत असल्याचे माहिती अधिकाराखालील (आरटीआय) विचारणेत उघड झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधत आहेत. "मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न" असं म्हणत राहुल यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून LIC ला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे" असं म्हटलं आहे. 

"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (7 सप्टेंबर) याबाबत एक ट्विट केलं आहे. '७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार' असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. "देशाच्या आणखी २६ सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहे. ७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार. मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते ‘मैं देश नही बिकने दूँगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

आरटीआय अर्जात या कंपन्यांची नावेही विचारण्यात आली होती. त्यानुसार सर्व २६ कंपन्यांच्या नावांसह, विकल्या गेलेल्या भागीदारीची टक्केवारी बाजारपेठेनुसार निश्चित केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, आरटीआयमध्ये युको बँकेच्या खासगीकरणाच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने सर्व सेक्टर्स खासगी क्षेत्रासाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध क्षेत्रांच्या खासगीकरणाच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा