CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:39 AM2020-09-08T11:39:04+5:302020-09-08T11:42:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

CoronaVirus Marathi News countrys largest covid care center will be closed | CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 42,80,423 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,809 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,133 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 72,775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. मात्र हे सेंटर 15 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. रुग्ण येत नसल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. कमी लक्षणं आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांसाठी हे सेंटर तयार केलं होतं. सेंटरमध्ये 10,000 हून अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोविड सेंटरमधील अंथरुण, पंखे, पाण्याचं मशीन यासारखं उपयोगी सामान हे सरकारी वसतिगृह आणि रुग्णालयांना देण्यात येणार आहे. कोरोनाचे कमी आणि लक्षणं नसलेल्या रुग्णालयांना होम क्वारंटाइनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये येणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. जोपर्यंत होम क्वारंटाईनची सुविधा देण्यात आली नव्हती तोपर्यंत रुग्णांची संख्या जास्त होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ 

कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी 70 हजारांहून अधिक लोक बरे झाले. तर शनिवारी 73,642 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सोमवारी 69,564 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,82,542  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. देशातील मृत्यूदर हा 1.72% आहे. देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. 

कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती

कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. हिमाचल प्रदेश, मणिपूर, चंडीगड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, अंदमान निकोबार, लडाख, मेघालय, सिक्किम आणि मिझोरममध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही 15 हजारांहून कमी आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आसाम, ओडिशा आणि गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"

Web Title: CoronaVirus Marathi News countrys largest covid care center will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.