CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:23 PM2020-09-08T12:23:29+5:302020-09-08T12:42:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे.

centre launches toll free mental rehabilitation helpline support to people | CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून रुग्णसंख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णांचा आकडा 42,80,423 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,809 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,133 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 72,775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या लढ्यात मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. 

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. अशातच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मोदी सरकारने मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी 24 × 7 हेल्पलाईन सुरू केल्याची माहिती मिळत आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी सोमवारी 24 × 7 टोल-फ्री मानसिक आरोग्य हेल्पलाईन 'किरण' सुरू केली आहे. 1800-500-0019 हा हेल्पलाईन नंबर आहे. 

कोरोनाच्या लढ्यात आशेचा 'किरण'!

कोरोनाचं महाभयंकर संकट असताना लोकांच्या मनात असणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांचे योग्य पद्धतीने समुपदेशन करणं हा या हेल्पलाईनमागचा प्रमुख उद्देश आहे. स्क्रीनिंग, प्रथमोपचार, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचार आणि मानसिक आरोग्य कशापद्दतीने उत्तम राखायचं याबाबत येथे सल्ला दिला जाणार आहे. लोकांचे समुपदेशन केले जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सोमवारी 69,564 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,82,542  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. देशातील मृत्यूदर हा 1.72% आहे. देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Web Title: centre launches toll free mental rehabilitation helpline support to people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.