अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 03:10 PM2020-09-07T15:10:37+5:302020-09-07T15:14:14+5:30

दोन लाखांहून अधिक वेळा हे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात आले आहे.

google play store removed 6 android apps contains joker malware | अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

Next

नवी दिल्ली - मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र यामध्ये अनेक अ‍ॅप्सपासून धोका असतो. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने गुगल प्ले स्टोरवर असलेले सहा धोकादायक मेलवेयर असलेले अ‍ॅप्स शोधून काढले आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा हे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात आले आहे. सायबर सिक्योरिटी फर्म Pradeo च्या रिपोर्टनुसार, या सहा अ‍ॅप्समध्ये कनवीनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अ‍ॅपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सॅपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्सचा समावेश आहे.

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहे. मात्र तुमच्या फोनमध्ये असल्यास लगेचच डिलीट करा. जोकर मेलवेयर डिव्हाईसमध्ये आल्यानंतर युजर्सला प्रीमियम सर्व्हिससाठी माहिती न देता त्यांच्याकडून सब्सक्राईब करते. 2017 पासून गुगलने जोकर मेलवेयर असलेले असे 1700 अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहे. हे अ‍ॅप्स रुप बदलून सातत्याने येत असतात.


अ‍ॅपचा असा केला जातो वापर

गुगल प्ले स्टोरवर दिलेल्या माहिती नुसार, Convenient Scanner 2 अ‍ॅप आपल्या डॉक्यूमेंट स्कॅन करण्यासाठी किंवा ईमेल तसेच प्रिंट पाठवण्याचे काम करीत होते. Safety AppLock हे अ‍ॅपला पॅटर्न किंवा पासवर्ड लॉक करण्याचे काम करतं. Push Message-Texting & SMS हे एसएमएस आणि मेसेजिंग अ‍ॅप होते. ज्यात रिंगटोनपासून व्हायब्रेशन पॅटर्नपर्यंत कस्टमाइज करता येतं. Emoji Wallpaper अ‍ॅपचा वापर फोनचे बॅकग्राउंड बदलण्यासाठी केला जात होता. तर Separate Doc Scanner सुद्धा एक डॉक्यूमेंट स्कॅनर होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामध्ये PUBG अ‍ॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"

चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

Web Title: google play store removed 6 android apps contains joker malware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.