शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

रघुवर दास यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ खराब हवामानामुळे मोदींची अनुपस्थिती

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

रांची : भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली़ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे खराब हवामानामुळे दास यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकले नाही़ दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, अनेक व्हीआयपी या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाही़

रांची : भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली़ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे खराब हवामानामुळे दास यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकले नाही़ दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, अनेक व्हीआयपी या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाही़
येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर दास यांचा शपथविधी सोहळा पार पडला़ त्यांच्यासोबत नीलकंठ सिंग मुंडा, चंद्रशेखर प्रसाद सिंग, लुईस मरांडी (सर्व भाजपा)आणि चंद्रप्रकाश चौधरी(ऑल झारखंड स्टुडंट युनियन) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली़
मोदी आणि अमित शहा यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाहा, जयंत सिन्हा, सुदर्शन भगत आदी उपस्थित होते़
आदिवासीबहुल झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणारे दास हे पहिले बिगर आदिवासी नेते आहेत़ रघुवर दास यांनी यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-आजसू युतीने ८१ पैकी ४२ जागांवर विजय संपादित करून बहुमत प्राप्त केले आहे. दास हे झारखंडचे दहावे मुख्यमंत्री आहेत़ बाबूलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा यांच्यानंतर ते झारखंडमध्ये भाजपाचे तिसरे मुख्यमंत्री ठरले़

बॉक्स

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच
घेतला हातात झाडू
झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच रघुवर दास यांनी एका आदिवासी वस्तीत झाडू मारून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला़ यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्याच्या विकासाला वेग देण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा पुढे नेण्याची ग्वाही त्यांनी दिली़

बॉक्स
फडणवीसही पोहोचले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही रघुवर दास यांच्या शपथविधी सोहळ्याला पोहोचले़

बॉक्स
मोदींच्या शुभेच्छा
खराब हवामानामुळे रघुवर दास यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावू शकलो नाही़ मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो, असे टष्ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे़