आनंदानी फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:35+5:302015-08-11T00:03:35+5:30

पानावर लावली......

Quality of Honor by Anandnani Foundation | आनंदानी फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

आनंदानी फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

नावर लावली......
सोलापूर : स्व. टेहलियाराम आनंदानी फाऊंडेशनच्या वतीने सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा सत्कार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रविवारी गुरुनानक मंगल कार्यालयात करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अशीच यशाची एकेक शिखरे पार करीत सिंधी समाजाचे नाव मोठे करावे, असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. शहर भाजपाचे अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, संजय कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नारायणदास आनंदानी यांनी उपस्थितांचे स्वागत करीत प्रास्ताविक केले.
यावेळी सिंधी समाजातील लालचंद वाधवानी, शंकरलाल होतवानी, टिंकेश ग्यामलानी, इंदरलाल होतवानी, द्वारकादास आनंदानी, धनराज आनंदानी, पप्पू पमनानी, अनिल खानचंदानी, किशोर होतवानी, घनश्याम नानकामी, महेश धनवानी, दीपक कुकरेजा, बालराज, योगेश रावलानी, सुरेश होतवानी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्व. टेहलियाराम आनंदानी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी गुरुनानक मंगल कार्यालया सिंधी समाजातील गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रा. अशोक निंबर्गी, नारायणदास आनंदानी, शंकरलाल होतवानी, सुरेश होतवानी आदी.

Web Title: Quality of Honor by Anandnani Foundation