शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मुलांचे आवडते पदार्थ ठरताहेत जीवघेणे? मोमोज खाऊन झोपलेल्या बहीण-भावाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:25 IST

एकाच कुटुंबातील दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पंजाबच्या तरनतारनमध्ये एकाच कुटुंबातील दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा आणि नऊ वर्षांच्या बहीण-भावाची तब्येत अचानक बिघडली होती. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

६ वर्षांचा आरव आणि त्याची ९ वर्षांची दानिका यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होतं आणि मुलं पूर्णपणे निरोगी होती, मात्र रात्र होताच  परिस्थिती अचानक बदलली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांच्या हट्टापायी त्यांचे वडील विशाल यांनी मोमोज आणले होते. दोन्ही मुलांनी रात्री ते खाल्ले. यानंतर साधारण दोन तासांनी, म्हणजेच रात्री १० वाजेच्या सुमारास, दोघांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं.

रुग्णालयात डॉक्टरांनी मुलांवर उपचार सुरू केले, मात्र त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत गेली. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही दोन्ही मुलांची जीव वाचवता आला नाही. केवळ १० दिवसांपूर्वीच आरवचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. आता अचानक दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे पालकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. मुलांच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. डॉक्टरांचा रिपोर्ट आणि शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Momos suspected in siblings' sudden death; investigation underway.

Web Summary : In Punjab, two siblings died after eating momos. They fell ill suddenly and could not be saved. Police are investigating the cause of death, pending autopsy results. The family is devastated.
टॅग्स :PunjabपंजाबDeathमृत्यू