PM मोदींच्या सुरक्षेवरुन पंजाब सरकारने १ वर्षानंतर घेतली अॅक्शन!; ८ IPS आणि १ IAS अधिकाऱ्यांवर करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:15 IST2023-03-14T15:10:10+5:302023-03-14T15:15:06+5:30
पंजाबमध्ये मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले होते.

PM मोदींच्या सुरक्षेवरुन पंजाब सरकारने १ वर्षानंतर घेतली अॅक्शन!; ८ IPS आणि १ IAS अधिकाऱ्यांवर करणार कारवाई
पंजाबमध्ये मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आता एक वर्षानंतर पंजाब सरकारने अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मुख्य सचिव व्ही के जंजुआ यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना ९ अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आरोपपत्र पाठवले आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी पीएम मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते, तेव्हा भटिंडा विमानतळावरून हुसैनीवालाला जात असताना त्यांचा ताफा अर्धा तास फ्लायओव्हरवर अडकून पडला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याबद्दल पंजाब सरकार एका IAS अधिकारी आणि 8 IPS अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांच्याशिवाय डीआयजी सिद्धार्थ चटोपाध्याय, एसएसपी हरमनदीप सिंह हंस, एसएसपी चरणजीत सिंह, एडीजीपी नागेश्वर राव, एडीजी नरेश अरोरा, आयजी राकेश अग्रवाल, आयजी इंदरवीर सिंग आणि डीआयजी सुरजित सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.
'संसदेत सरासरीपेक्षाही कमी उपस्थिती अन् परदेशात जाऊन...', अनुराग ठाकुरांची राहुल गांधींवर टीका
नुकतेच केंद्र सरकारने पंजाब सरकारला पत्र लिहून पीएम मोदी सुरक्षा उल्लंघन प्रकरणी कारवाईचा अहवाल मागवला होता. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पंजाबचे मुख्य सचिव विजय कुमार जंजुआ यांना पत्र लिहून दोषी अधिकार्यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल मागवला होता. पत्रात कारवाईला झालेल्या दिरंगाईचा संदर्भ देत, कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते, यानंतर आता पंजाब सरकार कारवाई करत आहे.
गेल्या वर्षी ५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला येथे जात होते. यादरम्यान, पावसामुळे पीएम मोदींना रस्त्याने जावे लागले, मात्र यादरम्यान आंदोलकांनी हुसैनीवालापासून सुमारे ३० किमीचा रस्ता अडवला आणि त्यामुळे पीएम मोदींचा ताफा अर्धा तास उड्डाणपुलावर अडकून पडला.