भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:00 IST2026-01-05T18:58:57+5:302026-01-05T19:00:20+5:30
कोणाचं नशीब कधी आणि कुठे, कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक करणारी घटना पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातून समोर आली आहे.

फोटो - दैनिक भास्कर
कोणाचं नशीब कधी आणि कुठे, कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक करणारी घटना पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका क्षणात एका व्यक्तीचं नशीब बदललं. पंजाब स्टेट डिअर मंथली लॉटरीचं पहिलं बक्षीस गुरुदासपूर जिल्ह्यातील एका पिठाची गिरणी चालवणाऱ्या व्यक्तीला मिळालं आहे.
१.५ कोटी रुपयांच्या या घवघवीत बक्षिसाने हरदो बथवाला गावातील रहिवासी संदीप सिंग रंधावा यांचं संपूर्ण आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं आहे. संदीप सिंह रंधावा हे व्यवसायाने पिठाची गिरणी चालवतात. विशेष म्हणजे, त्यांनी ही लॉटरी केवळ योगायोगाने लॉटरी स्टॉलच्या मालकाच्या सांगण्यावरून खरेदी केली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि त्याच तिकिटाने त्यांना १.५ कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस मिळवून दिलं.
अवघ्या काही मिनिटात त्यांचं नशीब असं काही चमकलं की ते करोडपती झाले. संदीप सिंग रंधावा हे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांचे दूरचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. या लॉटरीमुळे त्यांच्या कुटुंबात आणि संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे.
पंजाबमध्ये लॉटरीची क्रेझ आणखी वाढली आहे. आता लोक मोठ्या संख्येने ल़ॉटरीची तिकिटं खरेदी करत आहेत. या लॉटरीचं पहिलं बक्षीस १० कोटी रुपये आणि दुसरं बक्षीस १ कोटी रुपये आहे. याचा निकाल १७ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. यावेळेसही अनेक जण आपलं नशीब आजमावत आहेत. याआधी देखील अनेक जण लॉटरीमुळे लखपती, करोडपती झाले आहेत.