शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election Result 2022 : राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:15 IST

Punjab Election Result 2022 : पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे.

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा विजय मिळताना दिसत आहे. आम आदमी पार्टी जवळपास 90 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबच्या या विजयाचा राज्यसभेत आम आदमी पार्टीला मोठा फायदा होऊ शकतो. जुलैपर्यंत आम आदमी पार्टी पंजाबमधून राज्यसभेच्या सात जागा जिंकू शकते. आम आदमी पार्टीला सातही जागा जिंकण्यात यश आले तर राज्यसभेतील त्यांच्या खासदारांची संख्या 10 होईल.

दरम्यान, पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. या पाच जागांवर निवडणूक आयोगाकडून मार्चअखेर निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राज्यसभेच्या खासदाराच्या जागेसाठी 18 ते 20 आमदारांचे मत आवश्यक आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या चार राज्यसभेतील खासदारांचा विजय निश्चित आहे. 

तसेच, काँग्रेसचा एकही सदस्य निवडणूक जिंकू शकेल, अशा स्थितीत दिसत नाही. पंजाबमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक होणार आहे. आम आदमी पार्टी या दोन्ही जागा आरामात जिंकू शकते. अशाप्रकारे आम आदमी पार्टी जुलैअखेर पंजाबमधून राज्यसभेच्या 7 जागा जिंकू शकते.

राज्यसभेत 'आप'ची स्थिती मजबूत होईल
आम आदमी पार्टीचे दिल्लीतून तीन राज्यसभा खासदार आहेत. जर आम आदमी पार्टी सर्व 7 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली तर ती 10 राज्यसभा खासदारांसह सभागृहात आपली ताकद वाढवेल. मात्र, पंजाबच्या संगरूर लोकसभा जागेवर पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला मैदानात उतरावे लागू शकते. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान या जागेवरून खासदार असून त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ही जागा सोडावी लागणार आहे. मात्र, संगरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा जागांवर आम आदमी पार्टीने जोरदार विजय नोंदवला आहे.
 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपPunjabपंजाबRajya Sabhaराज्यसभा