शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर कारखान्यातर्फे ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

अवसरी : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अवसरी : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर येथे शेतकरी विभागातील कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम भीमाशंकर साखर कारखाना व नेटाफिम इंडिया कंपनी यांच्या विद्यमाने झाला. परिसंवादात प्रदीप वळसे पाटील म्हणाले, ' साखर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकर्‍यांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना कर्मचारी ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष शेतावर काम करताना कर्मचार्‍यांकडील माहिती काळानुरूप परिपूर्ण असणे आवश्यक असते. शेती विभागात काम करणारे कर्मचारी म्हणजे कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे.'
यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख,चंद्रकांत ढगे, संचालक अशोक घुले, चंद्रकांत ढोबळे, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, नेटाफिम कंपनीचे विशाल भालेराव, शैलेश दगडे उपस्थित होते.
सहायक ऊस विकास अधिकारी दिनकर आवक यांनी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेतकरी अधिकारी अंकुश आढाव यांनी आभार मानले.
छायाचित्र ओळ : पारगाव (ता. आंबेगाव) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन कारखान्याचे संचालक ॲड. प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छायाचित्र : प्रताप हिंगे)