‘जलते चमन’ पुस्तकाचे प्रकाशन

By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30

सोलापूर : नसीम मन्नान सोलापुरी लिखित ‘जलते चमन’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असल्याची माहिती ए.बी. एन्टरटेन्मेंट बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक डॉ. ए.ए. बिजापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Publication of 'Jaltee Chaman' book | ‘जलते चमन’ पुस्तकाचे प्रकाशन

‘जलते चमन’ पुस्तकाचे प्रकाशन

लापूर : नसीम मन्नान सोलापुरी लिखित ‘जलते चमन’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असल्याची माहिती ए.बी. एन्टरटेन्मेंट बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक डॉ. ए.ए. बिजापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारगिल युद्धावर आधारित पै. नसीम मन्नान सोलापुरी लिखित नाटक ‘जलते चमन’ च्या प्रकाशनानंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र ट्रेड कौन्सिल प्रदेश अध्यक्ष अँड. अशोक ताजणे, ज्येष्ठ पत्रकार हाजी लतीफ नल्लामंदू, इसाक मणियार, प्रा. रशीद बिजापुरे, कामगार नेते बशीर अहमद आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Publication of 'Jaltee Chaman' book