पद्म पुरस्कारांसाठी जनतेने सुचवावीत कर्तृत्ववान नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:32 IST2021-07-12T09:32:03+5:302021-07-12T09:32:34+5:30

Padma Awards : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरून आवाहन. 

Public names to be nominated by the public for the Padma Awards pm narendra modi on twitter | पद्म पुरस्कारांसाठी जनतेने सुचवावीत कर्तृत्ववान नावे

पद्म पुरस्कारांसाठी जनतेने सुचवावीत कर्तृत्ववान नावे

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ट्विटरवरून आवाहन. 

नवी दिल्ली : भारतामध्ये अनेक कर्तृत्ववान व्यक्ती असून पद्म पुरस्कारांसाठी त्यांची नावे जनतेने १५ सप्टेंबरपर्यंत सुचवावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका ट्विटद्वारे केले. पद्म पुरस्कारांच्या नामांकनांसाठी पंतप्रधानांनी ट्विटरवरून आवाहन करणे हा या घटनेतील वेगळेपणा आहे. 

पद्म पुरस्कार हे खऱ्या अर्थाने जनतेचे पुरस्कार बनावेत याकरिता कर्तृत्ववान व्यक्तींची नामांकने लोकांकडून मागविण्यात येत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी म्हणाले होते. 


त्याच अनुषंगाने केलेल्या ट्विटमध्ये रविवारी मोदी यांनी म्हटले आहे की, देशामध्ये अनेक व्यक्ती तळागाळामध्ये खूप वेग‌ळ्या पद्धतीचे काम करत असतात. अशा व्यक्तींची अनेकांना माहितीही नसते. अशा व्यक्ती जर माहिती असतील तर जनतेने त्यांचे पद्म पुरस्कारासाठी नामांकन केले पाहिजे. ज्या सरकारी वेबसाईटवर जाऊन ही माहिती भरायची आहे त्याची लिंकही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये दिली आहे. 

Web Title: Public names to be nominated by the public for the Padma Awards pm narendra modi on twitter