मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी काही लाखांची तरतूद करण्यात आल्याने रेल्वेने यंदाच्या वर्षी हा प्रकल्प बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे. कल्याण-कर्जत मार्गाच्या विस्तारासाठीही यंदा तरतूद नाही. कल्याण-कसारा मार्गाच्या विस्तारीकरणासाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्यातील प्रकल्पांत लातूर कोच फॅक्टरीसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी २८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २३ टक्क्यांची जादा तरतूद करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. मध्य रेल्वेसाठी एकूण ७ हजार ९५५ कोटींची तरतूद आहे, तर तीन हजार ७६० कोटी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, दुहेरी मार्गिका, कोंडीतून सुटकेसाठी दिले जाणार आहेत. अत्याधुनिक सिग्नल प्रणाली, संरक्षक भिंत, एकात्मिक सुरक्षा प्रणाली, रेल्वे कर्मचाºयांच्या सुविधेसाठीही तरतूद करण्यात आली आहे.सुरक्षा प्रकल्पांसाठी निधी
च्मध्य रेल्वे झोनमधील ११ स्थानकांत अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी ४०.४५ कोटी खर्च अपेक्षित असून, २.२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
च्मेमू, डेमू आणि उपनगरीय लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी ३५६.७१ कोटींचा खर्च अपेक्षित असून, फक्त पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
च्रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी सुरक्षा भिंत उभारण्यासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित असून, १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
च्प्रवाशांच्या सुविधेसाठी २८४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी २०४ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

बोगदा आणि पुलांच्या
कामासाठी तरतूद
कर्जत ते लोणावळा २.३ कोटी
कल्याण ते इगतपुरी १ कोटी
कल्याण ते कर्जत १.५ कोटी

तांत्रिक दुरुस्तीसाठी तरतूद
च्मुंबई विभागातील सिग्नल प्रणाली अत्याधुनिक करण्यासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे.
च्मध्य रेल्वे झोनमध्ये ३७२ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण खर्च ३७२ कोटी रुपये असून, २८ कोटी रुपये मंजुरी मिळाली आहे.
च्ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
च्एलटीटी, वाडीबंदर, कल्याण, माटुंगा येथील वर्कशॉप आणि शेडसाठी २२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हे प्रकल्प लागणार मार्गी
च्कल्याण-कसारा या ६७.६२ कि.मी. तिसºया मार्गिकेसाठी एकूण ९१३ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून, त्यासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
च्लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढविण्यासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ४९.९६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
च्पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यासाठी ११८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


च्सीएसएमटी स्थानकावर २४ डब्यांच्या मेल, एक्स्प्रेसना थांबा देण्यासाठी स्थानकाचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये १० ते १३ फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च ११४ कोटी रुपये असून, ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
च्एटीव्हीएम मशिनची संख्या प्रत्येक स्थानकावर वाढविण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च ४९.५५ असून, १.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
च्११० स्थानकांवर ३३७ स्मार्ट कार्ड असलेली एटीव्हीएम मशिन बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण खर्च ६.३ कोटी रुपये असून, ३.१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
च्मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग १६० ते २०० किमी वेगासाठी सक्षम करण्याकरिता ५०० कोटींची तरतूद.
च्विरार-अंधेरी धिम्या मार्गावरील १५ डब्यांच्या लोकलसाठी १२ कोटी.
च्विक्रोळी येथील रोड ओव्हर ब्रीजसाठी ४ कोटी आणि दिवा येथील रोड ओव्हर ब्रीजसाठी ६ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A provision of only a thousand for the Kalyan-Murbad railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.