शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

म्हसणे टोलनाक्यावर ठिय्या अपूर्ण कामांचा निषेध : स्थानिकांना कामावर घेण्याची मागणी

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

सुपा : नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाट्यावर असलेल्या चेतक एन्टरप्राईजेसच्या टोलनाक्यावर परिसरातील वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप करीत कामे अपूर्ण असतानाच टोल वसुली होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले़

सुपा : नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाट्यावर असलेल्या चेतक एन्टरप्राईजेसच्या टोलनाक्यावर परिसरातील वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप करीत कामे अपूर्ण असतानाच टोल वसुली होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले़
पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे नगर-पुणे मार्गावर चेतक कंपनीने टोल नाका उभारला आहे़ या कंपनीकडून रस्त्याची विविध कामे प्रलंबित असतानाही टोल वसुली केली जात आहे़ तसेच स्थानिकांना कामावरुन काढले आहे़ कंपनीच्या या मनमानीविरोधात सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले़ नारायणगव्हाणमधील चौपदरीकरणाचे रखडलेले काम सुरु करावे, पाच हजार वृक्षांची लागवड करावी, स्थानिकांना रोजगार द्यावा, साईडपट्ट्या कराव्यात, उखडलेला रस्ता दुरुस्त करावा, या मागण्यांसाठी टोलनाक्यावर सुमारे अर्धा तास टोल बंद आंदोलन करण्यात आले. तेथे पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर चेतक कंपनीच्या दालनात तासभर कंपनीच्या अधिकार्‍यांसमोर ठिय्या देण्यात आला.
परिसरातील गावांना टोलमाफी असली तरी कंपनीच्या वतीने वसुली केली जाते़ त्यांचा सामान्य माणसांना त्रास होतो. नारायणगव्हाण गावाजवळचा रस्ता चौपदरी करण्याबाबत अनेक आंदोलने होऊनही त्यात बांधकाम विभाग व कंत्राटदार कोणतीच हालचाल करीत नाही. या गावामध्ये दुपदरी रस्ता असल्याने अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ अनेक युवकांनी यापूर्वी उपोषणेही केली आहेत. तरीपण अद्याप चौपदरीकरणाचे काम होत नसल्याबाबत शेळके यांनी बांधकाम विभागाचे अभियंता पवार यांना धारेवर धरले़
चेतक एंटरप्राईजेसने टोलनाक्यावर पूर्वी स्थानिक युवकांना रोजगार दिला होता. पण कंपनीने त्यांना डच्चू देऊन परप्रांतीयांना काम दिल्याने स्थानिक युवकांवर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे, असे शेळके यांनी तहसीलदार देशमुख, मंडलाधिकारी राजाराम गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले़
बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता खैरे यांनी नारायणगव्हाणमधील चौपदरीकरणाबाबत प्रस्ताव पाठविला आहे,साईडपट्ट्या व इतर कामे लवकरच करून घेण्यात येतील, पाच हजार झाडे पावसाळ्यात लावली जातील, शौचालये व स्वच्छतागृहे बांधण्याचा लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. तर कंपनीचे व्यवस्थापक पांडे व राजेश मोगरा यांनी वरिष्ठांशी चर्चा करून दहा दिवसात आपल्या मागण्यांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी अशोक शेळके, कानिफनाथ पोपळघट आदींसह युवक उपस्थित होते.