अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चारित्र्य चांगले - भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 12:21 IST2018-06-06T12:02:43+5:302018-06-06T12:21:58+5:30

भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य..

"Prostitutes Better Than Government Officials": BJP Lawmaker's Shocker | अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चारित्र्य चांगले - भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चारित्र्य चांगले - भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली - अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केले आहे. उत्तर प्रदेशमधील बैरियाचे भाजपा आमदार असलेले सुरेंद्र सिंह यांनी अधिकाऱ्यांबद्दल असे अपशब्द वापरले आहेत. 

अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असते. त्या पैसे घेऊन प्रमाणिकपणे आपले काम करतात. पण अधिकारी पैसे घेऊन काम करतील याची शाश्वती नाही असे मत आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सोशल मीडियावर नेटीझन्सनी खरपूस समाचार घेतला आहे. यावर भाजपाच्या इतर नेत्यांकडून कोणत्याही प्रतिक्रिया आलेवी नाही. 



 

वादग्रस्त वक्तव्य करण्याची सुरेंद्र सिंह यांची हि काही पहिलीच वेळ नाही.. याआधीही त्यांनी तीन मुलांच्या आईवर बलात्कार झाल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचप्रमाणे मोबाईलमुळे महिला आणि तरुणीवर बलात्कार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते. 

Web Title: "Prostitutes Better Than Government Officials": BJP Lawmaker's Shocker