Propaganda to be closer to saffron party - Rajinikanth | भगव्या पक्षाशी जवळीक असल्याचा अपप्रचार -रजनीकांत
भगव्या पक्षाशी जवळीक असल्याचा अपप्रचार -रजनीकांत

चेन्नई : माझी भगव्या पक्षाशी (भाजप) जवळीक असल्याचा अपप्रचार प्रसारमाध्यमांतील काही लोक व अन्य घटक करीत आहेत, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी म्हटले आहे. ते म्हणाले की, तामिळ संत तिरुवल्लूवर व माझे भगवीकरण करण्याचा प्रयत्न काही जणांनी चालविला आहे. मात्र, त्या लोकांच्या सापळ्यात आम्ही अडकणार नाही.

रजनीकांत यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन यांनी म्हटले होते. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर रजनीकांत यांनी सांगितले की, मी अजून असा विचार केलेला नाही. तामिळ संत तिरुवल्लूवर यांच्या काव्यातील एक कडवे तामिळनाडू भाजपने १ नोव्हेंबर रोजी टिष्ट्वटरवर झळकविले होते.
 

Web Title: Propaganda to be closer to saffron party - Rajinikanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.