शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

डोअर बेल खराब झाली, मोदी मोदी ओरडा; हा आहे प्रचाराचा पुणेरी पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 5:10 PM

रामनगर क्षेत्रातील भाजपाच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे

ग्वालियर - आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील लोकांमध्ये तसेच राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. उमेदवार असो वा राजकीय नेते लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कोणतीची कमतरता बाळगत नाही. कोणतीही भन्नाट पाटी किंवा पोस्टर्स बघितल्यानंतर साहजिकच आपल्या डोळ्यासमोर पुणेरी पॅटर्न आठवतो. याच धर्तीवर मध्य प्रदेशातील ग्वालियर भागात भाजपाच्या समर्थकांकडून पुणेरी पद्धतीने हटके प्रचार करण्यात येतोय. मुरैना जिल्ह्यामधील गावांमध्ये लोकांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर्स लोकांचे लक्ष नक्कीच वेधून घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपा समर्थकांनी हे पोस्टर्स लोकांच्या घराबाहेर लावण्यात आले आहेत. 

रामनगर क्षेत्रातील भाजपाच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.  अशा प्रकारचे पोस्टर रामनगरमधील एक डझनहून अधिक घरांच्या बाहेर चिकटवण्यात आले आहे.  ज्या घरांच्या बाहेर असे पोस्टर लावण्यात आले आहेत त्यातील एका घराचा मालक गिर्राज शर्मा यांनी सांगितले की,  आमच्या घराची डोअर बेल खराब झाली होती. त्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने अशा प्रकारचा मजकूर लिहून हे पोस्टर मी घराबाहेर लावलं. मात्र त्यानंतर हळूहळू या पोस्टरचं लोणं संपूर्ण रामनगर परिसरात पसरत गेलं. सध्या हे पोस्टर सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलं आहे. 

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून आणि कार्यकर्त्यांकडून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध शक्कल लढवल्या जातात. टीशर्ट, झेंडे, टोपी या प्रचार साहित्यासह अनेक माध्यमातून लोकांनी आपल्याच पक्षाला मतदान करावं यासाठी आवाहन केलं जातं. मात्र अशा भन्नाट कल्पनांनी निवडणुकीच्या वातावरणात हास्याचे रंग मात्र भरले जातात. देशात लोकसभा निवडणुका लागू झाल्यानंतर गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. 91 लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान पार पडले असून आणखी 6 टप्प्यातील मतदान बाकी आहे. मध्यप्रदेशमध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मात्र भाजपा समर्थकांकडून प्रचाराची वापरण्यात आलेली ही अनोखी शक्कल किती फायदेशीर ठरणार हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेलच.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019